महानाट्य अयोध्यातुन उलगडावर अयोध्येचा इतिहास…

२४ जानेवारीला कुडाळ मध्ये आयोजन:आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती..

⚡कुडाळ ता.२२-: सिंधूसंकल्प अकादमी यांच्या वतीने स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेलं अयोध्या हे महानाट्य येत्या २४ जानेवारीला कुडाळ मध्ये होणार सदर आहे. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संकुलाच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.या महानाट्यातून केवळ रामायणावर भाष्य नसून गेल्या कित्येक हजार वर्षांचा अयोध्येचा इतिहास यातून उलगडणार आहे. सर्व नाट्य रसिकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा असं आवाहन सिंधू संकल्प अकादमीचे प्रणय तेली, लेखक दिग्दर्शक केदार देसाई, भूषण तेजम आणि ईशान देसाई यांनी केल आहे. कुडाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रणय तेली म्हणाले, कुडाळ तालुक्यातील सर्व कलाकारांनी केलेला हा चांगला प्रयत्न आहे. या नाटकाचे वैशिष्ट्य असे आहे की ४० स्थानिक कलाकारांची टीम या नाटकामध्ये काम करते आहे. त्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक केदार देसाई आहेत. या नाटकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल एआय चा आहे. ते सगळं ग्राफिक्सचे काम हे ईशान देसाई यांनी केले आहे. नाटक बघताना तुमच्या लक्षात येईल की ते काम किती महत्त्वाचे आहे. आम्हाला सांगायला आनंद होतो की याची निर्मिती, याच्यामधली ऍक्टिंग, ग्राफिक्स याच्यामधली वेशभूषा, रंगभूषा या सगळ्या गोष्टी आपल्या स्थानिक लोकांनी केलेले आहेत आणि एक उच्च दर्जाचे महानाट्य निर्मित झालेले आहे.
या महानाट्याचा पहिला शो हा वेंगुर्ला मध्ये झाला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर ओरोस, मालवण, देवगड, सावंतवाडीमध्ये आणि बेळगाव मध्ये या नाटकाचे शो झाले. बेळगाव मध्ये तर सलग दोन दिवस स्टेडियम वर याचे शो झाले. लेखक दिग्दर्शक केदार देसाई यांनी यासाठी फार अभ्यास करून हे महानाट्य उभे केले आहे. अभिनेते तेजस पिंगुळकर यांनी श्री प्रभू रामचंद्रांची भूमिका केली आहे आणि त्याला त्यांनी त्या भूमिकेला खूप चांगला न्याय दिला आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यातली प्रत्येक कॅरेक्टर आहेत त्या सगळ्यांची त्याच्यात इन्व्हॉलमेंट हि फार मोठी आहे.
सिंधू संकल्प अकादमी हा एक प्लॅटफॉर्म आहे त्यातून स्थानिक कलाकारांना प्रोफेशनल लेवलला आपण स्टॅन्ड करायचे आहे असे आपले नियोजन आहे. सुरुवातीला आमच्या कुडाळ मध्ये हे नाटक झाले नव्हते. सगळ्यांची इच्छा होती की ते आपल्या कुडाळ मध्ये व्हावं. म्हणून हे नाटक येत्या २४ जानेवारीला कुडाळमध्ये होत आहे. असे प्रणय तेली यांनी सांगितले. त्या बरोबरच नृत्य, नाट्य आणि ग्राफिक्स आणि संगीत असे संगम असे हे महानाट्य आहे. विजय गवंडे यांनी याला म्युझिक दिले आहे. त्या नाटकातील तीन गाणी केदार देसाई यांनी, एक गाणं गुरु ठाकूर यांनी तर दोन गीते गीत रामायण मधील आहेत.
या नाटकासाठी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहिले सहकार्य केले. त्यानंतर आताचे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांचे देखील आम्हाला या प्रवासात सहकार्य लाभले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश कार्यकारिणीवर असलेले अतुल काळसेकर, रणजीत देसाई, राजन तेली आणि भाई सावंत यांच्या पाठिंब्याशिवाय शिवाय एवढे मोठे महानाट्य आम्ही करू शकलो नसतो. त्यामुळे या सर्वांचे श्री. तेली यांनी आभार मानले.
यावेळी नाटकाचे लेखक दिग्दर्शक केदार देसाई म्हणाले, अतिशय अभ्यास करून अयोध्येचा हजारो वर्षांचा इतिहास या महानाट्यातून मांडायचा प्रयत्न केला आहे. लोकांना माहिती नसलेल्या गोष्टी लेखी पुराव्यानिशी उपलब्ध असलेल्या गोष्टी या महानाट्यातून तुम्हाला दिसतील. अयोध्येच्या प्रांगणात त्या अयोध्येचा त्या मंदिरासाठी आजपर्यंत जवळजवळ पावणेदोन लाख हिंदू मारले गेल आहेत. फक्त त्या एका मंदिराच्या दारात. ते मंदिर वाचवायला या पूर्ण कालखंडात, हे आपल्याला माहित नाही. म्हणून मी याची टॅगलाईन देताना भारत वर्षातील अलौकिक धर्म युद्ध अशी दिली आहे. अयोध्या हा विषयच मोठा आहे त्यामुळे तो मोठ्या कॅनव्हासवर मांडायचा प्रयत्न आमचा होता. नेहमीच्या नाट्यगृहात हे शक्य झाले नसते. त्यासाठी मोकळ्या जागी हे महानाट्य घडते असे श्री. देसाई यांनी सांगितले.
या नाटकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आहे. ते काम ईशान देसाई यांनी केले आहे. त्याविषयी त्यांनी माहिती दिली. आपल्याकडे आपल्या जुन्या गोष्टी इंटरनेट वर नाहीयेत त्यामुळे अयोध्येचा तो जुना काळ उभा करणे खूप मोठे आव्हान होते असे ते म्हणाले. सिंधू संकल्प अकादमीचे सचिव यांनी देखील हे नाटक सर्वानी पाहावे असे आवाहन केलं. यावेळी तेजस पिंगुळकर, निलेश गुरव, शुभम तारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page