त्रिंबक येथील रामेश्वर मंदिराच्या धर्मशाळेच्या कामाचे भूमिपूजन…!

⚡मालवण ता.१९-:
मालवण तालुक्यातील त्रिंबक येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिराच्या धर्मशाळेच्या (भक्त निवास) इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री. अशोक पेंडूरकर व सौ. स्मिता पेंडूरकर या दाम्पत्याच्या हस्ते आणि गावचे उपाध्ये श्री अनिल बापट यांच्या पौरोहित्याखाली करण्यात आले.

या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर मौजे त्रिंबक ट्रस्टचे अध्यक्ष रघुवीर घाडीगावकर, सचिव सीताराम घाडीगावकर, खजिनदार संतोष घाडीगावकर, बारापाच मानकरी, सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, पोलीस पाटील, तसेच गावचे प्रतिष्ठित व्यक्ती प्रशांत घाडीगावकर, सुभाष मेस्त्री, बाळा बागवे, विश्वास शेडगे, बाबाजी साटम, ज्ञानदीप लिंगायत (गुरव), विष्णू घाडीगावकर, रोहिदास घाडीगावकर, प्रदीप घाडीगावकर, प्रतिमा घाडीगावकर, सुहासिनी घाडीगावकर, संजीवनी घाडीगावकर, प्रिया घाडीगावकर, उदय मेहंदळे, ग्रामस्थ व महिला आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page