प्रकल्प कटाक्षाने राबवण्याचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा निर्णय..
⚡देवगड ता.१९-:
देवगड हापूस आंब्यांच्या नावाने होणाऱ्या बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी हापूसच्या जीआय ची देवगड
तालुक्यासाठीची रजिस्टर प्रॉपरायटर अर्थात custodian असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने
प्रत्येक देवगड हापूस आंब्यांला युनिक कोडचा (UID) देण्याचा निर्णय 2 जानेवारी 2025 रोजी घेतला होता. या
विषयाबाबत आणखी माहीती देण्यासाठी आजण २ तारखेला हजर राहू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी संस्थेने १८ तारखेला दुसरे
चर्चासत्र आयोजित केले होते.
त्यामध्ये विस्तृत चर्चा होऊन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादाच्या बळावर या वषीपासून ‘युनिक कोड असेल तोच देवगड हापूस’ अशी बाजारात मार्केटिंग करून देवगडच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बोगस आंब्याला पुरता पायबंद घालावा. या मागणीवर शेतकऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जीआय कायद्याने प्राप्त होणारे
अधिकार वापरुन आता देवगड हापूसच्या नावाने विकल्या जाणाऱ्या प्रत्येक आंब्यांवर युनिक कोड असणे
बंधनकारक केले आहे. त्याकरता टीपी सील (TP Seal) बाबतचे पेटंट मिळालेल्या मुंबई येथील सनसोल्यूशन या कंपनीबरोबर संस्थेने आधीच करार केलेला आहे, असे देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. अजित गोगटे
यांनी सांगितले.
केवळ जीआय धारक शेतकऱ्यांना मिळणार कोड. जीआय नोंदणी शिवाय ‘हापूस’ वापरणे हा दखलपात्र गुन्हा.
हे कोड केवळ जीआय धा धारक शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत 2018 साली हापूसला जीआय जाहीर झाला जीआय कायद्यानुसार हापूस नावाने आंबा विकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जीआय नोंदणी करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याला हापूस वापरता येणार नाही. विना नोंदणी हापूस वापरणे हे अदाखलपत्र गुन्हा असून सहा महिने ते तीन वर्ष कैदेची किंवा रुपये 50 हजार ते दोन लाख इतक्या दंडाची तरतूद आहे असे संस्थेचे सल्लागार अँड ओमकार सप्रे यांनी सांगितले.देवगड मध्ये सुमारे ५००० शेतकरी असूनही गेल्या सहा वर्षांत
केवळ अंदाजे ५०० शेतकऱ्यांनी जीआय नोंदणी घेतली आहे.१०
वर्षाच्या नोंदणी साठी केवळ २०१० रुपये शुल्क असताना जीआय नोंदणी घेण्यासाठी देवगडचा शेतकरी उदासीन आहे. तरी शेतकऱ्यांचे हित पाहता, कायद्यात तरतूद असली आणि कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार संस्थेकडे असतानाही
संस्थेने आजपर्यंत त्याबाबत कोणतीही पाऊले उचलली नाहीत.परंतु आता बोगसगिरी च्या विरोधात वेळीच पाऊले उचलली
नाहीत,तर पुढील काही वर्षात ‘हापूस’हे नाव जेनेरिक, म्हणजे वैशिष्ट्य- रहित होऊन जीआय देखील रद्द होईल.आणि
परिणामी ‘देवगड हापूस’ हे नाव देखील पुढील काही वर्षात नामशेष होईल, असेही अँड. सप्रे यांनी सांगितले.
आंबा राहिला तरच शेतकरी राहणार आहे, या विचाराने देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हे पाऊल उचलले आहे,असे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. अजित गोगटे यांनी सांगितले.
असे मिळणार युनिक कोड
हे युनिक कोड संस्थेच्या मार्फत फेब्रुवारी महिन्यात वितरित केले जाणार आहेत अशा युनिक पुढच्या बोगस वापर होऊ नये . याकरिता शेतकऱ्यांना त्याची देवगड तालुका आंबा कलमे याची सातबारा उताऱ्यावर नोंद व तपासून आणि त्यांची उत्पादक क्षमता बघून तितकेच कोड मिळणार आहेत. त्याकरिता ३१ जानेवारी २०२५ च्या आज शेतकऱ्यांनी संस्थेकडे संपर्क साधून नोंदणी करायची आहे. आणि कोडची ऑर्डर नोंदवावी असे आवाहन अँड अजित गोगटे यांनी केले आहे.
युनिक कोडचा वापर कसा होणार?
सन सोल्यूशन ला मिळालेले पेटंट हे नक्कल न होणाऱ्या आणि एकदाच वापर होणाऱ्या कोडसाठी मिळाले आहे.सन सोल्यूशन
चे प्रशांत यादव यांनी सांगितले की प्रत्येक कोड हा दोन भागात केलेल्या स्टीकरच्या माध्यमात असतो.त्या कोडचा एक भाग स्टिकरच्या खाली असतो. तो भाग वाचण्याकरता स्टिकर काढल्यास त्याचे आपोआप दोन तुकडे होतात, ज्यामुळे स्टिकर पुन्हा वापरता येणार नाही.
ग्राहकांनी युनिक कोडचा वापर कसा करता येणार?
ग्राहकांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून साध्या सोप्या पद्धतीने आंब्यांची तपासणी होणार आहे.यासाठी +919167668899 या सन सोल्यूशन च्या अँटी-काउंटरफीनटंग व्हॉट्सॲपच्या नंबरवर ग्राहकांनी सदर स्टिकरचा फोटो पाठवल्यास ही यंत्रणा त्या स्टिकर वरील कोड वाचते, आणि तिकडच्या खालच्या बाजूला असलेल्या कोडचा भाग पाठवा असा मेसेज पाठवते. मग ग्राहकांनी तो कोड लिहून पाठविल्यानंतर सदर आंब्यांच्या सं संदर्भातील मेसेज यंत्रणे कडून येतो. या मेसेजवरून शेतकऱ्यांचे
नाव, गावाचे नाव, जीआय क्रमांक, इत्यादी माहीती ग्राहकांना दिली जाईल, जेणेकरून आपण खात असलेला आंबा 100%
खात्रीचाच देवगड हापूस आहे याची ग्राहकांना खात्री होईल.आणि मागणी बरोबरच आंब्यांच्या दरात वाढ होऊन शेतक-याचे
आर्थिक जीवनमान उंचवणार आहे. या विषयीचा डेमो देखील चर्चासत्रात शेतकऱ्यांना दाखवण्यात आला.
देवगड हापूससाठी स्वतंत्र जीआय ची मागणी
सध्या हापूस आंब्याला मिळालेले जीआय मानांकन हे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी मिळालेली आहे. परंतु बाजारात देवगड हापूसला बाजारात पसंती असल्यामुळे देवगड हापूससाठी स्वतंत्र जीआय मिळवा
अशी मागणी देवगडच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
देवगडच्या हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला मान देऊन देवगड हापूसच्या स्वतंत्र जीआय साठी पुन्हा एकदा
पावले उचलण्याचा आणि एकत्रित हापूसच्या जीआय मधून बाहेर पडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचा निर्णय सदर चर्चासत्रात घेण्यात आला.
सदर चर्चासत्रात मार्गदर्शक म्हणून संस्थेचे सल्लागार अँड ओमकार सप्रे सन सोल्युशनचे प्रशांत यादव यांनी शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन शंका निरसन करून घेतले. शेतकरी वर्गातून विद्यालय जोशी, पाटणकर, महेश गोखले,चंदू वेळणकर,संजय वेळणकर, विजय फोंडकर, सुधीर जोशी, प्रकाश डामरी,सचिन देवधर ,दिलीप केळकर, राजीव वाळके ,मंदार केळकर, प्रमोद वळंजू, रामदास अनुभवणे, नचिकेत भिडे, इत्यादी शेतकऱ्यानी भाग घेऊन शंकासमाधान करून घेतले संस्थेचे अध्यक्ष अँड अजित गोगटे,उपाध्यक्ष डी बी बलवान, संचालक जयवंत लाड, राजेंद्र वालकर,तसेच व्यवस्थापक संतोष पाटकर आदी उपस्थित होते
