⚡वेंगुर्ला ता.१९-: महाराष्ट्र शासन कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकिय रेखाकलामध्ये प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूर्लेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
शाळेतील कु. चिन्मय कुडपकर या विद्यार्थ्यांने ऐलिमेटंरी ड्राॅईंग ग्रेड परिक्षेत ‘अ‘ श्रेणी आणि इतर विद्यार्थ्यांनी ‘क‘ श्रेणी प्राप्त करत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना कला शिक्षक पांडुरंग मिशाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी देसाई-मोरे, मुख्याध्यापक मिताली होडावडेकर, शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
फोटो – चिन्मय कुडपकर
रेखाकलामध्ये चिन्मय कुडपकरचे यश…
