बाल आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला येथील आधार फाऊंडेशन व वेंगुर्ला गॅस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या बाल आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६ ते ११ वयोगटातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या रांगण्याच्या स्पर्धेनेही धम्माल उडविली.
आधार फाऊंडेशनच्या पहिल्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन फाऊंडेशनचे अध्यक्ष माधुरी वेंगुर्लेकर यांच्या हस्ते झाल. यावेळी उपाध्यक्ष किरण वेंगुर्लेकर, खजिनदार डॉ.वंदन वेंगुर्लेकर, सदस्य कावेरी वेंगुर्लेकर, वैदेही वेंगुर्लेकर, सहसचिव सगुण मातोंडकर, निवृत्त शिक्षक जयराम वायंगणकर, नगर वाचनालयाचे कार्यवाह कैवल्य पवार, प्रा.महेश बोवलेकर, वसंत तांडेल, डॉ.वसुधा मोरे, सोनाली सावंत, गीता गवंडे, प्रा.वसंत नंदगिरीकर, कर्पूरगौर जाधव, महेंद्र मातोंडकर, शिवराज वेंगुर्लेकर, स्मिता कोणेकर, भानू मांजरेकर, किशोर सावंत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी केले. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे.
रांगण्याची स्पर्धा (वयोगट ६ ते ११ महिने) – प्रथम – अद्वैत ओगले, द्वितीय-गौरी खानोलकर, तृतीय-रूद्रा हळदणकर, उत्तेजनार्थ-भार्गवी कुर्ले, द्रुविका रगजी व मनस्वी जाधव. सुदृढ बालक स्पर्धा (वयोगट-३ वर्षाखालील) – प्रथम-श्लोक साळगांवकर, द्वितीय-घना पार्सेकर, तृतीय-कुश खराडे, उत्तेजनार्थ-हितांशु गोळम व अर्जुन जाधव. बडबडगीत स्पर्धा (वयोगट-३ ते ६ वर्षे) – प्रथम – जिवीका आंदुर्लेकर, द्वितीय-सार्थक लांजेकर, तृतीय-प्राप्ती मोरे, उत्तेजनार्थ-आरोही चव्हाण व सानवी खराडे. वेशभूष स्पर्धा (वयोगट ३ ते ६ वर्षे) – प्रथम – कनिका इंदुलकर, द्वितीय-जिवीका आंदुर्लेकर, तृतीय-युगा मसुरकर, उत्तेजनार्थ-श्लोक परब व ज्ञानेश्वरी करे. चारही स्पर्धेत ९६ मुलांनी सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या मेळाव्यासाठी आधार कन्सल्टन्सी आणि फायनाशियल सव्र्हसेस व वेंगुर्ला गॅस सव्र्हस यांचे सहकार्य लाभले.
फोटोओळी – बाल आनंद मेळाव्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page