पाढे पाठांतर स्पर्धेत देवबाग हायस्कूलचे यश…

⚡मालवण ता.१४-:
रोटरी क्लब मालवण आयोजित व रो.अपूर्व फर्नांडिस पुरस्कृत शालेय विद्यार्थ्यांसाठी मालवण तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेत इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या लहान गटामध्ये देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी गंधार दत्तप्रसाद तेंडोलकर यांने तृतीय क्रमांक पटकावित यश प्राप्त केले.

गंधार तेंडोलकर याच्या यशाबद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी तसेच अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई या संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page