राजा गावडे यांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग ठेकेदार संघटना अध्यक्षपदी नियुक्ती…

⚡मालवण ता.१४-:
चौके गावचे माजी सरपंच, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजन उर्फ राजा गावडे यांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग ठेकेदार संघटना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी राजा गावडे यांना सुपूर्द केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग ठेकेदार संघटना अध्यक्ष म्हणून राजा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य करात असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी मंदार लुडबे,भाऊ मोर्जे, शानु वालावलकर संदीप भोजन व इतर उपस्थित होते

You cannot copy content of this page