मुंबई गोवा -महामार्गावर ओरोस येथे बोलेरो पिकअप चा अपघात…

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( क्रमांक – एम एच ५० एन २७९३ ) चा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास ओरोस येथील खालसा पंजाबी धाबा समोर झाला. ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जात असताना बोलेरो पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले व बोलेरो पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर आदळली व रस्त्याच्या मधोमध डाव्या बाजूने पलटी झाली. यामध्ये पिकअपमधील एकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला नजिकच असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

You cannot copy content of this page