⚡आंबोली,ता.९-: चौकुळ येथे आजी माजी विद्यार्थी मेळावा २०२२,चौकुळ यांच्या सौजन्याने चौकुळ येथे एम एस सी आय टी संगणक कक्ष सुरू करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत संगणक कक्षाचे उदघाटन चौकुळ ज्युनिअर काॅलेज येथे करण्यात आले. या प्रसंगी गावचे देवकार हिरुदादा गावडे,सोनूदादा गावडे, गिरीभाई गावडे, विजय तुकाराम गावडे, प्रा. मधुकर गावडे,अरुण गावडे मुंबई ग्रामस्थ संघटनेचे अध्यक्ष शामभाई गावडे, काॅलेज अस्थायी समिती अध्यक्ष रुपेश गावडे, चौकुळ हायस्कूल मुख्याध्यापिका समिक्षा दळवी, प्रा. विजय पाटील, प्रा. राधिका आवटे, प्रा. दिपाली गावडे व संगणक शिक्षिका संस्कृती चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष रुपेश गावडे यांनी सर्व आजी- माजी विद्यार्थीचे आभार मानले. आजी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा संगणक कक्ष उभा राहीला तसेच सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. आजी माजी विद्यार्थी मेळावा अध्यक्ष मा विजय लक्ष्मण गावडे व पदाधिकारी या सर्वांचे मनःपुर्वक आभार रुपेश गावडे यांनी मानले. या संगणक कक्षामुळे चौकुळ आंबोली गेळे व कुंभवडे या गावातील सर्वाना एमएससिआयटी करण्यासाठी सोय उपलब्द झाली आहे.
चौकुळ येथे एम एस सी आय टी संगणक कक्ष सुरू…
