बांद्यात उद्या मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.०७-: महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिन व सप्ताह अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल व बांदा पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत करण्यात आले आहे.

हे शिबीर विठ्ठल मंदिर सांस्कृतिक सभागृहात होणार असून या शिबिरात महिला व पुरुष यांची मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात लाईफ टाईम हॉस्पिटल व एसएसपीएम मेडिकल कॉलेज पडवे येथील एमडी (मेडिसिन), स्त्रीरोगतज्ञ, नाक कान घसा तज्ञ, नेत्रचिकित्सक आदी तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तपासणीनंतर रुग्णांना औषधे मोफत देण्यात येणार आहेत.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सहकार्याने याचठिकाणी रक्तदान शिबीर व रक्तगट तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी, नागरिकांनी, तरुण मंडळे यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page