दुचाकी आणि चारचाकी अपघातात एकाचा मृत्यू…

सिंधुदुर्गनगरी येथे झाला होता अपघात

ओरोस ता ३
सिंधुदुर्गनगरी पोलीस मुख्यालया समोरील कोको हॉटेलच्या पुढील वळणावर दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅगनार गाडीने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या चालक श्रीकृष्ण सावंत यांचा गोवा येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.
3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.50 वा.चे मानाने सिंधुदुर्गनगरी पोलीस मुख्यालया समोरील कोको हॉटेलच्या पुढील वळणावर हा अपघात झाला. फिर्यादी तेजस हरेश सावंत, वय -22 वर्षे ,व्यवसाय- शिक्षण, रा. ओरोस खुर्द डोंगरेवाडी, याचे भाऊ श्रीकृष्ण हरेश सावंत हे आपले ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच 07 यु 1236 ही ओरोस फाटा ते गजानन हॉटेल अशी एकेरी वाहतूक करीत असताना सिंधुदुर्गनगरी कोको हॉटेलच्या पुढील वळणावर आला असता त्याच रोडने समोरून एकेरी मार्ग असून सुद्धा विरुद्ध रस्त्याने ओरोस फाट्याच्या दिशेने एक गोल्ड रंगाची व्हॅगनार गाडी नंबर एम एच 02 सी झेड 0536 ही गाडी भरधाव वेगात चालवीत आणून फिर्यादी यांचे भाऊ श्रीकृष्ण हरेश सावंत यांचे मोटरसायकलला जोरात धडक दिली व त्यात मोटर सायकल चालक श्रीकृष्ण सावंत यांचे डोकीस गंभीर दुखापत झाली व मोटरसायकलचे नुकसान झाले. या प्रकरणी चालक विनय मंगेश आळवे, वय-30 वर्षे ,रा. कांबळेवीर वेंगुर्ला, ता- वेंगुर्ला यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जखमी श्रीकृष्ण सावंत यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. सायंकाळी उपचार सुरू असताना श्रीकृष्ण सावंत यांचे निधन झाले आहे.

You cannot copy content of this page