अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल:आनंदवाडी बंदर परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनाबाबत देवगड पोलिसांचे पोलिसांना निवेदन..
देवगड (प्रतिनीधी)
देवगड आनंदवाडी जेटी येथील संतोष जगताप यांची पानटपरी कडी कोयड्याने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केला.हा प्रकार शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उजेडात आला . देवगड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,देवगड आनंदवाडी जेटी नजीक असलेल्या संतोष अरुण जगताप ४८ (जगतापवाडी) यांची पानटपरी अज्ञात चोरट्याने कडी कोयंड्याने गुरुवारी रात्री नंतर फोडण्याचा प्रयत्न केला.नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत अरुण संतोष जगताप यांनी देवगड पोलिसात तक्रार दिल्यानंतर,देवगड पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली. अज्ञात चोरट्याविरोधात देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबतचा अधिक तपास उदय शिरगावकर करत आहे.
ग्रामस्थांनी दिले याबाबत निवेदन
आनंदवाडी बंदर जेटी परिसरातील चोरीच्या घटनांबाबत देवगड पोलिसांना मच्छिमार ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले आहे.
देवगड आनंदवाडी जेटी येथे वाढत्या चोरींबाबत नागरिकांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला कळविले,असून नुकतेच लेखी निवेदन देखील पोलीस प्रशासनाला कळविले आहे.या घटनेमुळे स्थानिक मच्छीमारांमधून व छोट्या व्यवसायिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या आठवड्याभरात एकूण ५ चोरीचे घटना जेटीवर यापूर्वी घडल्या असून यामध्ये ३ दुचाकी चोरी तसेच एकच दुकान दोन वेळा फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून झाला आहे.त्यामुळे छोटे व्यावसायिक हैराण झाले आहेत. अनेक दुचाकी मधून पेट्रोल चोरी करण्याचे देखील प्रमाण वाढले असल्याचे कळते.पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे.असे या दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
