⚡बांदा ता.०२-: बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळच्या सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या स्वानंदी परिवारचा स्नेह मेळावा गेली दोन वर्षे बांदा येथे आयोजित करण्यात येत असून या मेळाव्यास सेवानिवृत्तांची लक्षणीय उपस्थिती असते. या वर्षीचा स्वानंदी परिवारचा स्नेहमेळावा बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
येथील आनंदी मंगल कार्यालय येथे सोहळा संपन्न होणार आहे. स्नेह मेळाव्याचै औचित्य साधून वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या परिसरातील सदस्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. तरी स्वानंदी परिवारातील सर्व सदस्यांनी मेळाव्यास उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद द्विगुणित करावा व आपले अनुभव कथन करावेत असे आवाहन आयोजन समितीने केलै आहे.
