⚡बांदा ता.०१-: राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने सुशीला गणेश गवाणकर स्मृति जिल्हास्तरीय शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा निरंजना गवाणकर यांनी पुरस्कृत केली आहे.
ही स्पर्धा इयत्ता आठवी ते इयत्ता नववी या शालेय गटासाठी आहे. निबंध स्पर्धेसाठी 'भारतीय लोकशाहीत संविधानाचे महत्त्व', 'कोकण पर्यटन विकासाच्या माझ्या कल्पना', 'रतन टाटा उद्योग क्षेत्रातील एक दीपस्तंभ' हे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर 600 ते 700 शब्द मर्यादित निबंध लिखाण करावे. आखीव कागदावर एकाच बाजूला लिखाण असावे. एका शाळेतून जास्तीत जास्त तीन विद्यार्थी स्पर्धक सहभागी होऊ शकतात. निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ही 21 जानेवारी आहे. निबंध बंद लिफाफ्यातून गुरुनाथ नार्वेकर रा. गवळीटेम्ब बांदा, तालुका सावंतवाडी किंवा अमेय देसाई हायस्कूल परुळे तालुका वेंगुर्ला यांच्याकडे पाठवावेत.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये २०००, १५००, १००० स्मृतिचिन्ह, तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी ५०० रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन राधारंग फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
