ऍड. संग्राम देसाई:लायन्स फेस्टिव्हलच्या अंतिम दिवशी मान्यवरांचा सत्कार,फेस्टिव्हलच्या अंतिम दिवशी उदंड प्रतिसाद..
⚡कुडाळ ता.०१-: महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य ते चेअरमन या प्रवासात लायन्स क्लब ऑफ कुडाळचे फार मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल अध्यक्ष व लायन्स क्लबचे सदस्य अँड संग्राम देसाई यांनी केले. लायन्स फेस्टिवलच्या चौथ्या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या 23 व्या लायन्स फूड फेस्टिवलला कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर चौथ्या दिवशी सुमारे वीस हजारोंहुन अधिक उपस्थिती होती. तर संपूर्ण चार दिवसाच्या महोत्सवास साठ हजाराची लक्षणीय उपस्थिती लाभली. यावेळी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अँड संग्राम देसाई, सारस्वत बँकेचे संचालक अनिल आंबेस्कर सीए परीक्षा पास झालेली कसाल येथील तन्वी कदम, कणकवलीतील सीए अमोल खानोलकर, लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नेरुरकर आणि नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा करून आलेला सिद्धार्थ सौदागर या सर्वांना लायन्स क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात आले. माजी प्रांतपाल अजित फाटक, ऍड अजित भणगे, सीए सुनील सौदागर, लक्ष्मी ज्वेलर्सचे राहुल पाटणकर, राजू पाटणकर अँड श्रीनिवास नाईक लायन सेवा संकुल अध्यक्ष ऍड अमोल सामंत लायन्स क्लब कुडाळ प्रेसिडेंट चंद्रशेखर पुनाळेकर लायन फेस्टिवल चेअरमन गणेश म्हाडदळकर आनंद बांदिवडेकर सीए सागर तेली, संजीव प्रभू डॉ श्रुती सामंत सुनेत्रा फाटक शोभा माने डॉ दिपाली काजरेकर प्रकाश नेरुरकर सुजाता तेली अनंत शिंदे नयन भणगे अँड गौरी देसाई शुभांगी सौदागर श्रद्धा खानोलकर,सारस्वत बँकेचे कुडाळ शाखा अधिकारी योगेश ठाकूर ऍड समीर कुळकर्णी डॉ सुशांता कुळकर्णी मिकी तेरसे अनुप तेली सचिन सावंत मेघा सुकी राजवीर पाटील अँड शेखर वैद्य,अँड मिहीर भणगे, जीवन बांदेकर शैलेश मुंडये, साईश सामंत कपिल शिरसाट राजन कोरगावकर मंजुनाथ फडके मनोज मठकर आनंद कर्पे मंगेश तेंडुलकर लायन्सक्लबचे पदाधिकारी ,जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सुमारे 20 हजाराचा जनसागर कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर लोटला होता.
यावेळी बोलताना अँड संग्राम देसाई म्हणाले, लायन्स व बार कौन्सिलचे काहीतरी कनेक्शन आहे. बार कौन्सिलच्या तीन वर्षाच्या प्रवासात मी पहिला सदस्य झालो. त्यानंतर दुसऱ्या वेळी उपाध्यक्ष झालो आणि तिसऱ्या वेळी अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. तिन्ही वेळा लायन्स फेस्टिवलमध्येच माझे सत्कार झालेले आहेत. गेले कित्येक वर्षे लायन्सचा सुरू असणारा लायन्स फूड फेस्टिवल आठवणींना उजाळा देणारा आहे. माझ्या आयुष्यात वाटचाल करताना लायन्स क्लबचे सुद्धा मोठे योगदान आहे. विशेष म्हणजे वकिली क्षेत्रात वाटचाल करताना वडिलांबरोबरच माझे मार्गदर्शक अँड अजित भणगे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्याचबरोबर आयुष्य कसे जगावे यांचे मार्गदर्शन देणारे जे आज आपल्यात नाहीत असे डॉ नंदन सामंत यांना मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या आठवणी ह्या हृदयातच आहेत आणि बार कौन्सिलच्या प्रवासात वाटचाल करताना ज्या पदावर आहे त्याचे सर्व क्रेडिट माझ्या सर्व वकील मित्रासह माझे मित्र अँड अमोल सामंत यांना देतो. माझ्या यशात संपूर्ण लायन्स टीम सोबत आहे असे सांगितले.
सारस्वत बँकेचे संचालक श्री आंबेस्कर यांनी मनोरंजना बरोबरच महोत्सवाच्या माध्यमातून उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ कुडाळ गेली कित्येक वर्षे लायन्स फेस्टिवल घेऊन या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी हजारोंना पर्वणी दिलेली आहे. एक वर्ष लायन्स तर दुसऱ्या वर्षी रोटरी या सेवाभावी संस्था अशा प्रकारचे महोत्सव घेऊन सामाजिकबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रालाही चालना देत आहेत, हे विशेष अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सीए परीक्षा पास झालेल्या कसाल येथील कुमारी तन्वी कदम हिने ही परीक्षा पास करताना माझ्यामध्ये कॉन्फिडन्स होता. मी त्यानुसारच अभ्यास केला होता, हे आत्मविश्वासाने सांगताना सर्व लायन्स पदाधिकाऱ्यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व तिच्या कॉन्फिडन्स बद्दल अभिनंदनपण सत्कार केला. यावेळी कणकवलीतील सीए अमोल खानोलकर लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नेरुरकर आणि नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा करून आलेला सिद्धार्थ सौदागर या सर्वांना यावेळी लायन्स क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात आले. दरम्यान
नुकताच पिंगुळी महोत्सव झाला सर्वांच्या उस्फूर्त प्रतिसादावर हा महोत्सव यशस्वी केला त्याबद्दल संपूर्ण गावाचे व टीमचे सरपंच अजय आकेरकर यांचा अभिनंदनपर सत्कार सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बादल चौधरी व निलेश गुरव यांनी केले.
