*नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बांदा सरपंच अक्रम खान यांनी केले आहे
💫 *बांदा:-* वाढत्या रुग्णसंख्येचा फैलाव लक्षात घेऊन आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन , ग्रामपंचायत तसेच व्यापारी संघ बांदा यांच्या निर्णयाने उद्या संपूर्ण बांदा बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.सर्व अत्यावश्यक सेवा सुद्धा यावेळी बंद ठेवण्यात येणार असून मेडिकल, किराणा, भाजीपाला पूर्ण दिवस बंद असणार आहेत. सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.
