⚡बांदा ता.३०-: डेगवे मोयझरवाडी येथे मंगळवार दिनांक ३१ रोजी सकाळी ९ वाजता शेतकरी बांधवाना विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात शेतकऱ्यांना कृषी अधिकारी, वन विभागाचे अधिकारी व पर्यटन क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन शिबिराचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन आयोजक सीताराम उर्फ आबा देसाई आणि परिवार यांनी केले आहे.
डेगवेत उद्या शेतकरी बांधवाना विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…
