भालचंद्र गोसावी:नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे स्नेहसंमेलन;समाजाच्या लोगोचे अनावरण..
⚡कुडाळ ता.२५-: समाजाच्या प्रवाहात वाटचाल करताना सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना विसरू नये त्यांची सेवा करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोसावी यांनी आज विद्यार्थी गुणगौरव स्नेहमेळाव्यात केले
नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्नेहमेळावा आज मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धिविनायक हॉल येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे दर्शन गोसावी मंडळाचे उपाध्यक्ष साईनाथ गोसावी सचिव सदानंद गोसावी जिल्हा कार्यकारिणी संचालक रवींद्रनाथ गोसावी रूपाली गोसावी झिलू गोसावी संदीप गोसावी संजय गोसावी शंकर गोसावी सुशील गोसावी सुरज गोसावी शरद गोसावी उदय गोसावी भाऊ गोसावी संजय गोसावी गोरखनाथ गोसावी जिल्हा महिला कार्यकारणी अध्यक्ष स्नेहा गोसावी विनया गोसावी श्वेता गोसावी स्नेहा गोसावी राजलता गोसावी स्नेहल गोसावी विद्या गोसावी शितल गोसावी सुलभा गोसावी अनिता गोसावी वंदना गोसावी गौरी गोसावी रश्मी गोसावी वेदिका गोसावी सुजाता गोसावी नम्रता गोसावी मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी समाजबांधव आदि मोठ्या संख्येने उपस्थित होता
यावेळी बोलताना दर्शन गोसावी म्हणाले, समाजात एकीची गरज आहे आज अनेक समाज न्यायासाठी रस्त्यावर उतरत आहे मात्र आपला समाज खूप मागे दिसतो. मराठा समाजाने ताकद दाखवीत न्यायासाठी लढले आहे. त्याच पद्धतीने आपल्याला न्याय्य मागण्यासाठी लढा दिला पाहिजे. ज्या ज्या गोष्टी हव्या त्या मागून मिळत नसतील तर संघर्ष करावा लागेल गुणगौरव कार्यक्रम आपले पदाधिकारी आपल्याला, समाजाला एकत्र आणण्यासाठी काम करतात. यासाठी आपलेसुद्धा योगदान महत्वाचे आहे समाज विकसितसाठी महत्त्वाचा घटक विद्यार्थी आहे आरक्षणाचा फायदा आपण घेतला पाहिजे आजचा युवावर्ग मोबाईल मध्ये व्यस्त आहे मोबाईल पासून लांब राहून समाजाचे नाव उंचावण्यासाठी त्यांनी काम केले पाहिजे या भागाचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आरोग्याचे विविध प्रश्न मार्गी लागलेले आहेत असे सांगितले.
भाऊ गोसावी यांनी समाजाचे अनेक प्रश्न आहेत असे सांगत आपल्या समाजाला विसरू नका आपल्या जमिनी विकू नका घरे शाबूत ठेवा आणि समाजाच्या विकासासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगितले. बाळा गोसावी यांनी 32 देशांमध्ये आपला समाज पोहोचलेला आहे हे आपल्याला अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी समाजाची विद्यार्थ्यांनी प्राजक्ता उदय गोसावी हिने समाजाचा लोगो बनवला त्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले तसेच जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त नम्रता गोसावी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी हा सत्कार कुटुंबाचा सत्कार असून विद्यार्थ्यांनी भविष्यात वाटचाल करताना अभ्यासाबरोबरच संस्कारमय जीवनाकडे वाटचाल करावी असे आवाहन केले.
यावेळी गुणगौरव समारंभात इयत्ता दहावी बारावी पदवी पदवीत्तर पदविका, पूर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. तसेच समाजातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी मुंबई ठाणे आदी भागातून समाजबांधव उपस्थित होते सूत्रसंचालन झिलू गोसावी यांनी केले प्रास्ताविक संदीप गोसावी विध्यार्थी गुणगौरव सोहळा वाचन रोशनी गोसावी यांनी केले.
