वक्तृत्व स्पर्धेत प्रणिता मोंडकर, वैभवी चिपकर प्रथम…!

⚡वेंगुर्ला ता.२३-: नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे ८वी ते १२वीतील विद्यार्थ्यांसाठी ‘स्वामी विवेकानंद व स्वा.सावरकर‘ यांच्या साहित्यावर २२ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रणिता मोंडकर व वैभवी चिपकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

  ‘स्वामी विवेकानंदांची शिकवण‘ यात प्रथम-प्रणिता मोंडकर, द्वितीय- दिप्ती गवस्कर (दोन्ही सरस्वती विद्या.आरवली), तृतीय-ईशा गिरप (न्यू.इं.स्कूल, उभादांडा), चतुर्थ-वैष्णवी न्हावी (पाटकर हायस्कूल), पाचवा - साईदिप दाभोलकर (दाभोली स्कूल) यांनी तर ‘देशप्रेमी स्वातंत्र्यवीर सावरकर‘ यात प्रथम-वैभवी चिपकर, द्वितीय-प्रणाली गवंडे (न्यू.इं.स्कूल, उभादांडा), तृतीय-प्राची आरोलकर (सरस्वती विद्या.आरवली), चतुर्थ-पल्लवी प्रभूदेसाई (दाभोली स्कूल), पाचवा-स्नेहल भुबे (सरस्वती विद्या.आरवली) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण अनिल सौदागर, कैवल्य पवार आणि भाऊ करंगुटकर यांनी केले.
You cannot copy content of this page