श्यामसुंदर वाक्कर यांचे प्रतिपादन…
⚡मालवण ता.२२-: दहावीच्या वर्गात नापास झालेला सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव बनला, आज त्याचा धडा दहावीच्या पुस्तकात आहे, याला यश म्हणतात. विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले याला महत्त्व नाही, यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणी आणि गुणवान बनावे, आपले मन चांगले ठेवून कष्ट करावेत, तेव्हाच यश प्राप्त होते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट समालोचक आणि देवली गावचे सरपंच शामसुंदर वाक्कर यांनी येथे बोलताना केले.
डॉ. रा. का. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी संचलित वायरी भूतनाथ येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी कै. डॉ. रा. का. शिरोडकर यांची पुण्यतिथी आणि वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. त्यावेळी श्री. शामसुंदर वाक्कर हे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर, शिक्षक पालक संघांचे उपाध्यक्ष विरेश नाईक, वायरी भूतनाथ उपसरपंच सौ. प्राची माणगावकर, ग्रा. पं. सदस्य ममता तळगावकर, अंबाजी विद्यालय वायरीचे मुख्याध्यापक गणपत चौकेकर, परेश माणगावकर, अक्षय परुळेकर, रुपेश आळवे, दत्तात्रय सावंत, दीपेश नारिंग्रेकर, आपा लुडबे, मुकेश सावंत, अंकुश गोसावी, सौ. परकर, आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक केले. तर सुहास हिंदळेकर यांनी स्वागत केले. यावेळी श्रीनाथ फणसेकर, संभाजी कोरे, रामचंद्र गोसावी, सौ. शुभदा शिंदोळकर, सौ. मिताली मोंडकर, सौ. रोहिणी दिघे आदी शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यशवंत गावकर, दत्ता गोसावी उपस्थित होते.
प्रारंभी स्व. डॉ. रा. का. शिरोडकर यांच्या पुतळ्यास विरेश नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तर डॉ. शिरोडकर यांच्या प्रतिमेसं देवली सरपंच शामसुंदर वाक्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे श्री. वाक्कर यांच्या हस्ते हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर यांनी माजी विद्यार्थी ही प्रत्येक शाळेची ताकद असते रेकोबा हायस्कूल च्या जडणघडणीत माजी विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा असून आज माजी विद्यार्थ्यांनी जे सहकार्य केले आहे जो दातृत्व गुण दाखविला आहे तो दातृत्वचा गुण आगामी काळात विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा असे आवाहन केले
यावेळी विद्यार्थी कुमार वेद कुबल.
कुमारी प्रज्ञा पवार यांनी स्व. डॉ. रा. का. शिरोडकर यांच्यावर मनोगते व्यक्त केली तसेच अक्षय परुळेकर, रुपेश आळवे, विरेश नाईक यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर डगरे यांनी केले.
