नगराध्यक्षांच्या ‘त्या’ वक्तव्याने बालपणातील खेळाची आठवण…

सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांचा टोला : वॉटर एटीएमची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणार

*💫सावंतवाडी दि.१९-:* नगराध्यक्षाचे वक्तव्य म्हणजे बालपणातील “तू माझं सांगितल तर मी तुझं सांगेन” या खेळाची आठवण असा टोला सावंतवाडी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी लगावला आहे. सावंतवाडीच्या नगराध्यक्षांना हे वक्तव्य शोभत नसून, तेरी भी चूप मेरी भी चूप तर नाही ना असा टोला लगावला आहे. सावंतवाडी नगरपालिकेत मुरत असलेले सत्य बाहेर आलेच पाहिजे. त्यासाठी आपण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे तक्रार करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वॉटर ए टी एम ची चौकशी करून सत्य जनतेसमोर घेऊन येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नगराध्यक्षांनी देखील कंपास पेटी आणि बेनामी गाळ्या संदर्भात चौकशी करून ते जनतेसमोर आणावेत. बेनामी गाळ्यांची माहिती असून देखील नगराध्यक्ष संजू परब मुग गिळून गप्प का ? असा सवाल देखील कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page