कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर माजगावात कडक लॉक डाऊन… ?

उद्या ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय करणार जाहीर;सरपंच दिनेश सावंत व पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांची माहिती

*💫सावंतवाडी दि.१८-:* कोरोनाची विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता सावंतवाडी तालुक्यातील माजगाव गाव ८ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा ठराव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच दिनेश सावंत व पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी मांडला. दरम्यान पुढील धोरण ठरविण्यासाठी उद्या सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून गावातील लोकांनी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांनी फक्त गावाबाहेर जावे तसेच गावातील लोकांनी आपल्या आजूबाजूच्या दुकानातच लागणारे साहित्याची खरेदी करावी,विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहनही करण्यात आले. जिल्ह्यातील प्रथमच असे गाव आहे आपल्या गावासाठी सर्वजण एकत्र येत गाव लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

You cannot copy content of this page