तारकर्ली काळेथर मधील गैरकारभारविरुद्ध कारवाई करा..

डॉ. जितेंद्र केरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

*💫मालवण दि.१८-:* ग्रामपंचायत तारकर्ली काळेथर कार्यक्षेत्रात होणाऱ्या ग्रामसभा तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारात २०१३ ते २०१६ च्या कालावधीत बरेच गैरकारभार केले गेलेले आहेत. याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही न झाल्यास कोरोना संचारबंदीच्या कालावधीत भले माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तरी चालेल आपण दि. २२ एप्रिलपासून सकाळी ११ वाजल्यापासून गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे, असा इशारा डॉ. जितेंद्र केरकर यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. यामध्ये १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ग्रामपंचायत तारकर्ली काळेथरच्या कारभारात जो चुकीचा गैरकारभार केला गेला त्याबाबत सुनावणी तथा चौकशी लावण्याचे आदेश गटविकास अधिकारी मालवण यांना व्हावेत. ग्रा. पं. तारकर्ली काळेथरचा चौदाव्या वित्त आयोगाचा खर्च १०० टक्के होण्यास कोणाकडून विलंब लावला जात आहे. याची संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. २५ मार्च २०२१ रोजीच्या विकास ग्रामसभेतील नियमबाह्य ठरावांची चौकशी लावण्याचे आदेश व्हावेत. तारकर्ली ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील कोकण पर्यटन अंतर्गत विनियोग व कायदेशीर प्रक्रियेने करण्यात आलेल्या कार्यवाही अनुरुप ओपन जीम विकास कामाचे बिल तात्काळ अदा करण्यात यावे. या मुद्द्यांबाबत योग्य ती ठोस कारवाई २१ एप्रिलपूर्वी न केली गेल्यास २२ एप्रिल रोजी आमरण उपोषणास बसणार आहे, असे डॉ. केरकर यांनी म्हटले आहेत.

You cannot copy content of this page