एजंट सायली घाडी यांच्यावर राजकीय रागातून कारवाई केल्याचा आरोप
⚡ओरोस ता १६-: सिंधुदुर्ग बँकेच्या मोंड शाखेच्या पिग्मी एजंट सायली घाडी यांना बँकेच्या पिग्मी एजंट कामातून कमी करण्यात आले आहे. याविरोधात जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयासमोर जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी आज लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, देवगड युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी आदी उपस्थित आहेत. सायली घाडी मागील 24 वर्षे पिग्मी एजंट म्हणून कार्यरत आहेत. दरमहा 3 लाखांची उलाढाल त्या करतात. मात्र सायली घाडी ह्या ठाकरे शिवसेना पक्षाचे काम करतात या रागाने आकसापोटी बँकेकडून घाडी याना कामावरून कमी केले आहे. सायली घाडी यांनी पिग्मी एजंट म्हणून जिल्हा बँकेच्या हितासाठी ठेवी गोळा केल्या आहेत. राजकीय आकसापोटी घाडी याना कामावरून कमी करण्यात आले आहे. मागील 24 वर्षे प्रामाणिकपणे पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या घाडी यांनी बँकेचे हितच जोपासले. त्यामुळे याविरोधात जिल्हा बँक संचालक म्हणून सोमवार 16 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हा बँक संचालक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी छेडण्यात सुरुवात केली आहे.
