नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यावर कुडाळमध्ये जल्लोष…

⚡कुडाळ ता.१५-:
कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यावर कुडाळ येथील भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून घोषणाबाजी करण्यात आली.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ देण्यात आले हा शपथविधी नागपूर येथे संपन्न झाला. शपथविधी झाल्यावर कुडाळ भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतिशबाजी करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, बंड्या सावंत, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, ओंकार तेली, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, युवा मोर्चाचे पप्या तवटे, रुपेश कानडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, महिला मोर्चा शहराध्यक्ष मुक्ती परब, सुनील बांदेकर, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, राजू बक्षी, रेवती राणे, आदिती सावंत, रेखा काणेकर, सुप्रिया वालावलकर, संतोष वालावलकर, राकेश नेमळेकर, बाळा पावसकर, विजय कांबळी, प्रसन्ना गंगावणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page