मच्छीमार महिलांना मच्छीमार महिला संस्थेचा दिलासा…

किरकोळ मच्छी विक्री करणाऱ्यांना मिळणार कर्ज;अध्यक्ष स्नेहा केरकर यांची माहिती

*💫मालवण दि.१८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किरकोळ मासे विक्रेत्या मच्छीमार महिलांना दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार महिला संस्थेतर्फे कर्ज वाटप योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा सिंधुदुर्ग जिल्हा महिला मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षा व मच्छीमार महिलांच्या नेत्या स्नेहा केरकर यांनी केली आहे. याबाबत स्नेहा केरकर म्हणाल्या, आमच्यातीलच काही मच्छीमारांचे पुढारी विविध संस्था व मच्छीमारांमध्ये काही पक्षीय पुढाऱ्यांना हाताशी धरून राजकारण करीत आहेत. यापूर्वी निवडणुकातून मच्छीमार नेते म्हणून मिरवणारे नेते हल्ली बाजूला झाले असून नवीन नेते उदयास येत आहेत. त्याबद्दल आम्हांला काही म्हणायचे नाही. परंतु आता ते महिलांना आर्थिक प्रलोभने व आमिषे दाखवून सिंधुदुर्ग जिल्हा महिला मच्छीमार संस्थेच्या एकजुटीमध्ये फूट पाडून आपल्या नेत्यांना खूष करू पाहत आहेत. मच्छीमारांमध्ये संघर्ष करताना पारंपरिक विरुद्ध टॉलरवाले, पर्ससिनेटधारक, गीलनेटधारक, एल.ई.डी वाले पर्यटन व्यावसायिक या सर्वांविरुद्ध संघर्ष आणि मारामाऱ्या करून झाल्यावर लहान मोठ्या दुफळी निर्माण करून मोकळे झाले आहेत. त्यामुळे मच्छीमारांमधील नाराजी पाहून आता त्यांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाचा मार्गला शोधावा लागला आणि मच्छीमार व्यावसायीक महिलांना, पक्षीय नेत्यांना हाताशी धरून आर्थिक आमिषे दाखवून संस्थेमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही आमच्या संस्थेचे हिताचे रक्षण करण्यास समर्थ आहोत, असेही सौ. केरकर म्हणाल्या.

You cannot copy content of this page