आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २२ फेब्रुवारीला होणार…

मालवण (प्रतिनिधी)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सव शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. आज सकाळी प्रथेप्रमाणे धार्मिक विधी व देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली आहे.

आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित झाल्याने भक्त मंडळींमध्ये उत्साह संचारला आहे.

You cannot copy content of this page