लिपिक पदावर नियुक्तीसाठी जिल्हा परिषद समोर उपोषण…

ओरोस ता ९
९ ऑक्टोंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ लिपिक अधिसंख्य पदावर नियुक्ती देणे बंधनकारक असतानाही देवगड तालुक्यातील एका शिक्षण संस्थेकडून त्या पदावर आपल्याला नियुक्ती दिली जात नसल्याने तसेच याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी ही दुर्लक्ष करीत असल्याने दिव्यांग व्यक्ती प्रमोद मनोहरराव सोनसुकरे यांनी आज जिल्हा परिषद समोर संस्था आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात बेमुदत साखळी आंदोलन सुरु केले आहे. तसेच संबंधितांवर कारवाई व्हावी आणि आपल्याला नियुक्ती आदेश मिळावा. अशी मागणीही यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page