मालवणात ६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन मशाल रॅली…

⚡मालवण ता.०४-: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरीनिर्वाण दिन शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवणच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त सायंकाळी ६ वा. मालवण एसटी स्टॅन्ड मागील बौद्धवाडी येथील समाज मंदिर ते बांगीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – समाजमंदिर अशी अभिवादन मशाल रॅली काढण्यात येणार आहे. तरी या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page