युवकांची साथ आपल्यालाच मतपेटीतून विशालमय होणार…

विशाल परब:श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिरात श्रीफळ ठेऊन प्रचाराची सुरुवात..

⚡बांदा ता.१३-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचंड बेरोजगारी आहे. येथील आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. युवकांना आपल्याच गावात रोजगार तसेच उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करून देण्यात येणार आहेत. युवकांची साथ ही आपल्यालाच असून मतपेटी ही विशालमय होणार आहे. येथील जनता सुज्ञ असून यावेळी निश्चितच बदल घडेल असा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी व्यक्त केला. बांद्याचे आराध्य श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिरात श्रीफळ ठेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्री परब यांनी बांदा शहरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत दयानंद कुबल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page