भाजपा नेत्यांचे सर्व आरोप मोदींना लागू होताहेत-ना.उदय सामंत…

बाहेरगावाहून आलेल्या सर्वांची होणार रॅपिड टेस्ट;उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड सेंटर बंद करण्याचे निर्देश…

*💫कणकवली दि.१७-:* राजकारण आणि विरोध कधी करावा,हे भाजपला समजलं पाहिजे.देशाची लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु आहे.देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हाही लॉकडाऊन जाहीर करतील,अशी स्थिती आहे.मुख्यमंत्री व्हिडिओ कॉम्परन्स करताहेत,तर मोदी काय करताहेत.पश्चिम बंगालमध्ये एवढ्या मोठ्या सभा,पण एकही रुग्ण मिळत नाही.भाजपाचे नेते जे आरोप करताहेत ते सर्व आरोप मोदींना लागू होत असल्याचा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला.बाहेरगावाहून आलेल्या सर्वांची होणार रॅपिड टेस्ट होणार आहे.तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड सेंटर बंद करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. कणकवली तहसील कार्यालय येथे कणकवली वैभववाडी देवगड या तीन तालुक्याच्या कोव्हीड आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी आमदार वैभव नाईक,प्रांताधिकारी वैशाली राजमाने ,तहसीलदार रमेश पवार,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नितीन कटेकर,गटविकास अधीकारी अरुण चव्हाण, कणकवली मुख्याधिकारी अवधूत तावडे,तालूका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ.सी.एम. शिकलगार, डॉ. सतीश टाक ,डॉ गणेश चौगुले उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेताना अधिकार्‍यांकडून समस्या जाणून घेतल्या त्याचप्रमाणे यावर नियंत्रण आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपायोजना आपण करू शकतो याबाबत माहिती जाणून घेतली. जिल्हा सीमांवर कशा प्रकारे नियोजन केले आहे .कोविड सेंटर मध्ये बेडची उपलब्धता किती आहे? त्यामध्ये मिळणाऱ्या सेवा सुविधा कशा आहेत पोलीस प्रशासनाने ही खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.तसेच तिन्ही तालुक्यात कोविड सेंटरची बेड वाढण्याबाबद सुचना केल्या आहेत. लसीकरणाची माहिती घेऊन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण कोविड सेंटरला आहारात वाढ केली आहे. त्याना चांगला आहार मिळण्याबाबत सूचना दिल्या आहेत.त्यासाठी दर १७५ रुपये करण्यात आले असे ना. उदय सामंत यांनी सांगितले. कोव्हीड रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णवाहिका व्यवस्था आम्ही करतो,खनिकर्म २ रुग्णवाहिका आल्यावर त्या देणार आहोत.आता तीन तालुक्यातील १० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोव्हीड काम कर्मचारी चांगल्या पध्द्तीने करत आहेत.जे बाहेरून नागरिक येत असतील त्यांची रॅपिड टेस्ट केली जाणार असल्याचे ना.उदय सामंत यांनी जाहीर केले. कणकवली,देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातील ३०० अँक्टिव्ह आहेत,६४ जणांचा कोव्हीड मुळे मृत्यू झाला आहे.तिन्ही तालुक्यातील कोव्हीड रुग्णांसाठी बेड संख्या वाढवण्यात आली आहे.वैभववाडी तालुक्यातील दिगशी गावांमध्ये ६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.त्यापैकी १० रुग्ण बरे झाले आहेत,सोनाळी मधील त्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तिन्ही नगरपंचायत मध्ये २५ बेडची व्यवस्था करत आहेत,त्याला शासन मदत करणार आहे,असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी चुकीच्या पद्धतीने काम केले तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.चार्ज काढून घेतला आहे,त्यांना अजुन चार्ज दिला नाही,शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो.त्यासाठी डॉ.पाटील यांनी तक्रार केली पाहिजे.तसे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.शिवाजी महाराज यांचे आपण सच्चे पाईक आहोत. त्यामुळे तो प्रस्ताव द्या,त्यासाठी दुसऱ्या दिवशी ५० लाख देतो.कणकवलीवाशियाना हवी ती जागा मला मान्य असेल.लोकशाही मध्ये पालकमंत्री शिवसेनेचा आहे,म्हणून मी कोणावर अन्याय केला नाही, असं तुला पालक मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page