मांगेलीतील जळीत घराची केली पाहणी; प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने व्यक्त केला संताप…
⚡दोडामार्ग, ता.१२-: मंगेलितील एका घराला आग लागून जळाल्याचे कळताच त्याठिकाणी प्रशासना आधी अपक्ष उमेदवार अर्चना घारे जाऊन पोहोचल्या. आगीत जळालेल्या घराचे बरेच नुकसान झाले असून अद्याप प्रशासकीय यंत्रणा पोहोचली नसल्याने अर्चना घारे यांनी संताप व्यक्त केला. शनिवारी घडलेल्या या घटनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले ? त्याचा पंचनामा का करण्यात आला नाही? याबाबत घारे यांनी तहसीलदार अमोल पोवार यांना जाब विचारला. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचा सूचनाही त्यांनी केल्या.
मांगेली येथील शांताराम कृष्णा गवस त्यांच्या डोक्यावर घराचे छत्र नसल्याने ते झोपडी बांधून त्या झोपडीत रहातात. त्या राहत्या घर वाजा झोपडीला
शनिवारी आग लागली. त्या आगीत झोपडी जाळून खाक झाली. ही बातमी समजताच या विधानसभा निवडणुकीत उभे असलेले अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांनी भेट दिली. प्रचारा दरम्यान त्या दोडामार्ग तालुक्यात असताना त्यांनी प्रत्यक्ष मांगेली येथे जाऊन पाहणी केली. त्यांनी शांताराम गवस यांनी धिरा दिला. त्यांची कडून माहिती घेतली असता प्रशासन अधिकारी कोणीच यांनी भेट न देता पंचनामा देखील केला नसल्याचे समजले यावेळी घारे यांनी तेथूनच दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार यांना फोन द्वारे संपर्क साधला. मांगेली येथे घडलेल्या घटनेचे प्रशासनाने पाहणी केली नाही अथवा पंचनामा देखील केला नाही. यावरून त्यांनी प्रशासनाला अधिकाऱ्यांना बरेच धारेवर धरले. त्वरित याबाबत पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावे असे सूचित केले.
