⚡आंबोली ता.११-: चौकुळ गावातील भाजप पक्षाचे श्री विश्वास सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी आमदार तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेपक्षाचे अधिकृत उमेदवार श्री राजन तेली यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
यावेळी माजी राज्यमंत्री श्री. प्रविण भाई भोसले,चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
