दिपक केसरकर यांनाच मते देवून त्यांनी केलेल्या विकास कामांची पोच त्यांना देवुया…

अँड. नीता सावंत-कविटकर:वेंगुर्ले कॅम्प येथील शिवसेना शहर बैठक..

⚡वेंगुर्ले ता.१०-: सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून या मतदार संघात करोडो रूपयांची कामे केली. वेंगुर्ले शहरात सुमारे १०० कोटी रूपयांची कामे केली आहेत. या पर्यटनदृष्ट्या विकासाची महत्वाची कामे झालेली आहेत. या मतदार संघातील युवक, युवती महिला, शेतकरी, मच्छिमार आणि महिला बचत गटांना शासनाच्या सिंधुरत्न समृध्दी योजनेच्या रोजगार-स्वयंरोजगारासाठी ७५ टक्के अनुदानीत योजनांचा लाभ दिलेला आहे. त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणांत सक्षम होण्यास हातभार लाभला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात महिलांची मते मोठ्या प्रमाणांत असून महिलांना संघटीतपणे महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनाच मते देवून त्यांनी केलेल्या विकास कामांची पोच त्यांना देवुया त्यासाठी आपण महिलांची मते त्यांना मिळवून देण्यासाठी आतापासून काम करूया असे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक अँड. नीता सावंत-कविटकर यांनी वेंगुर्ले येथे आयोजित खेळा बैठकीत केले.

विधानसभा निवडणुकितील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-रिपाई महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या निवडणुक प्रचारार्थ महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक वेंगुर्ले कॅम्प येथील शिवसेना शहर उमेश येरम यांच्या घरालगत संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर उपस्थित महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख अँङ निता कविटकर-सावंत, भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष अँङ सुषमा प्रभू-खानोलकर, शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख शितल साळगांवकर, तालुका संघटक दिशा शेटकर, शहर उपसंघटक मनाली परब, अल्पसंख्यांक शहर संघटक शबाना शेख, भाजपाच्या वृंदा गवंडळकर, आकांक्षा परब, शितल आंगचेकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहर प्रमुख उमेश येरम यांचा समावेश होता.
राज्यातील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून दरमहा १५०० रूपये देण्याचा घेतलेला निर्णय व त्याचा लाभ महिलांना मिळण्यासाठी शिवसेना व भाजपा पक्षाच्या माध्यमातून लाभार्थी महिलांपर्यत हि योजना पोहचवित व त्यांचे फॉर्म मोफत भरून लाभ देण्यासाठी बजावलेली भुमिकेबाबत महिलांकडून शासनाबद्दल होत आहे. महिलांसाठीच्या या योजना यापुढे टिकविण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देऊन पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी आपल्या भागातील महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना मोठ्या प्रमाणांत मतदान होण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां बरोबरच लाभार्थी महिलांना प्रयत्न करा असे प्रतिपादन शिवसेनेच्या वेंगुर्ले शहर महिला संघटक अँङ श्रध्दा बावीस्कर यांनी कॅम्प येथे आयोजित महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

यावेळी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभू-खानोलकर यांनी, आपल्या महायुती सरकारने प्रथमच महिला, युवक, वृध्द यांच्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. महिलांचा सन्मान केलेला आहे. या योजनांचा लाभ आपल्या मतदार संघासह राज्यातील जनतेला झालेला आहे. आपले महायतीचे उमेदवार उमेदवार दिपक केसरकर यांनी दुरदृष्टीने विकासासाठी या मतदार संघात केलेली करोडो रूपयांची कामे समोर आहेत. महायुती सरकारच्या योजना टीकवण्यासाठी व अभ्यासपुर्ण विकासाचे टप्पे गाठण्यासाठी श्री. केसरकर यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणून त्यांना कामाची पोच देण्यासाठी महिलांनी स्वतः बरोबरच आपल्या आजूबाजूच्या महिलांना केसरकर यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महायुतीच्या महिला पदाधिकारी व कार्यकत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page