सावंतवाडीकरांचे माझ्यावर कायमच प्रेम…

दिपक केसरकर ; लोकसभेच्या मताचा परिणाम आता दिसणार नाही..

सावंतवाडी ता.१०-:महायुती सोबत मनसे नेहमीच राहिली आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत त्यामुळे मनसेचे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेमध्ये ही महायुतीचे काम करतील त्यामुळे त्यांचे पाठबळ या ठिकाणी आपल्याला मिळेल अशी आशा आहे. तर सावंतवाडी शहरातील जनतेचे माझ्यावर प्रेम आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत काही गैरसमज झाल्याने या ठिकाणी मताचा परिणाम दिसून आला होता परंतु या निवडणुकीमध्ये तसे घडणार नाही याची मला खात्री आहे असेही मंत्री केसरकर म्हणाले.

You cannot copy content of this page