राजन तेलींचा गंभीर आरोप: केसरकर निष्क्रिय;खोटारडा आमदार म्हणून त्यांची राज्यात ओळख..
⚡सावंतवाडी ता.१०-: महाविकास आघाडीतील मते फोडण्यासाठीच दीपक केसरकर व नारायण राणे यांनी अर्चना घारे परब यांना निवडणुकीच्या मैदानात उभे केले असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी काँग्रेसच्या बैठकीत केले.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, केसरकर आणि राणे यांनी मिळून महाविकास आघाडीची मते फोडण्यासाठी अर्चना घारे यांना उभे केले असून, आपण सर्वांनी एकत्र मिळून हा डाव हाणून पाडायचा आहे असे आवाहन राजन तेली यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. राज्यातील निष्क्रिय आमदारांच्या यादीत दीपक केसरकर यांचे नाव असून, त्यांनी आतापर्यंत खोटे बोलण्याचेच काम केले आहे. असा खोटा बोलणारा आमदार कुठेही शोधून सापडणार नाही. अशी जोरदार टीका देखील त्यांनी यावेळी केली. या खोटारड्या आमदाराला कंटाळल्यामुळे महायुतीतील कोणताही घटक पक्ष दीपक केसरकर यांचे काम करायला तयार नसल्यानेच वरिष्ठ नेत्यांना त्यांचा प्रचार करण्यासाठी सावंतवाडीत यावे लागत आहे. यावरून त्यांचे अपयश दिसून येते अशी जोरदार टीका देखील केली.
