सावंतवाडी मतदारसंघात एकदा काम करण्याची मला संधी द्या…

राजन तेली:साटेली भेडशी बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी साधला संवाद..

⚡सावंतवाडी ता.०९-: दीपक केसरकरांनी सावंतवाडी मतदार संघातील मतदारांचा शिवसेनेची गद्दारी करून अपमान केला आहे तुमची प्रतारणा केली आहे त्यामुळे हीच वचपा काढण्याची वेळ आहे त्यामुळे या मतदारसंघात एकदा काम करण्याची मला संधी द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केले. श्री तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यात गाव भेट दिली. यावेळी साटेली भेडशी बाजारपेठेत सुद्धा व्यापाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी तालुकाप्रमुख संजय गवस संतोष मोयेॅ संदीप नाईक रुपेश गवस बाबुराव धुरी मदन राणे विनिता घडी श्रेयाली गवस संदेश वरक राजू गावडे विकी धरणे विनय गवस प्रदीप गावडे आदि उपस्थित होते.
श्री तेली पुढे म्हणाले विधानसभा निवडणूक ही भवितव्य घडविणारी निवडणूक आहे.त्यामुळे काम न करणार्‍या केसरकर याना घरी बसवा. ज्या शिवसेनेने दोन वेळा आमदार केले मंत्री केले त्या शिवसेनेशी गद्दारी आणि विश्वासघात केला.त्यामुळे याठिकाणचे मतदार त्यांना कधीही माफ करणार नाही.मला या मतदार संघात एकदा काम करण्याची संधी द्या आरोग्याचा रोजगाराचा प्रश्न एका वर्षात मार्गाला लावीन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिला दरम्यान मतदारांनी श्री तेली याना उस्फूर्त प्रतिसाद दिला. तेली पुढे म्हणाले निवडणूक आली की केसरकर भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल करतात.घोषणांचा पाऊस पडतात मात्र प्रत्यक्षात एकही ठोस काम न केल्यामुळे केसरकर यांच्याबद्द्ल नाराजी आहे.ही नाराजी मत पेटीतून दाखवून द्या,या मतदार संघातील महाविकास आघाडीची ताकद दाखवून देऊया,या मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी कधीही कमी पडणार नाही त्यासाठी तुम्ही ठाकरे शिवसेनेला मतदान करा असेही ते म्हणाले.
श्री भोसले म्हणाले मतदार संघात कोणताही विकास न केलेला व्यक्ती मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखवत फिरत

You cannot copy content of this page