पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती: प्रांत अधिवेशनच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल;अतुल काळसेकर..
सावंतवाडी ता.०९-:
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 59 वे कोकण प्रांत अधिवेशन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे 27 ते 29 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. याबतची माहिती संघटनेचे पदाधिकारी यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, हे प्रांत अधिवेशन प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असून, यात 1 हजारहुन अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याचा विश्वास देखील अतुल काळसेकर यांनी व्यक्त केला आहे.
