देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील जामसंडे खाकशी सडा येथील निखिल कोयघाडी यांच्या घरानजीक गाडी लावण्याचे पक्क्या शेडमध्ये
अवैधरित्या गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी प्रकाश सहदेव परब (६१ ईळये सडा) या संशयीताविरुद्ध देवगड पोलिसांनी कारवाई केली आहे. संशयीताकडून
१४,८०० रुपये किमतीची अवैद्य दारूसाठा देवगड पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई
७ नोव्हेंबर रोजी दुपारी १:१५ वाजता करण्यात आली.
देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर ,हवालदार उदय शिरगावकर, महिला हवालदार कविटकर,पोलीस नाईक धोपटे विजय पाटील यांनी ही कारवाई केली. संशयीताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई)नुसार कारवाई केली आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर यांनी देवगड पोलिसात दिली. अधिक तपास देवगड पोलीस हवालदार उदय शिरगावकर करत आहेत.
