धनगर समाजाने वैभव नाईक यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नये-:नवलराज काळे…

कुडाळ : वैभव नाईक यांना पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी बोगस पक्ष प्रवेशाचा एककलमी कार्यक्रम सुरु केला असून कुडाळ मतदारसंघातील एक दोन व्यक्तींचे पक्षप्रवेश घेत ते संपूर्ण गावच आपल्या सोबत असल्याचा दिखावा करत आहेत. आज कसाल धनगरवाडी येथे झालेला पक्षप्रवेश त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. केवळ आपले अस्तित्व दाखवण्यासाठी ज्या लोकांचा राजकारणाशी दूर दूर पर्यंत काहीही संबंध नाही अश्या लोकांचा वैभव नाईक पक्षप्रवेश दाखवत आहेत. ज्या धनगर समाजातील लोकांचा वैभव नाईक यांनी पक्षप्रवेश दाखवला त्या धनगर समाजासाठी वैभव नाईक यांनी गेल्या दहावर्षात काय केलं हा संशोधन विषय असून त्यांनी दहा पैकी सात वर्षे सत्तेत असूनही धनगर समाजाचा तांडावस्ती विकासाचा एक रुपयाही मतदारसंघात आणला नाही अशी टीका नवलराज काळे यांनी केली आहे.

राज्यात युतीच सरकार आल्यानंतर पहिल्यांदा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या मागणीनुसार  तांडावस्तीचा निधी निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आला आता पर्यंत तब्बल ४ कोटींचा निधी धनगर समाजाच्या वाडी वस्तीवर जाणारे रस्ते पाणी लाईट व्यवस्था यासाठी निलेश राणे यांनी मंजूर केला. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल बांधकाम योजनेतून आता पर्यंत १५ पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांची घरकुल की पालकमंत्रांनी रवींद्र चव्हाण व निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाली. त्यामुळे आमचा पूर्ण धनगर समाज हा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या पाठीशी ठाम राहील. वैभव नाईक यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी केलं आहे.
You cannot copy content of this page