माझ्या विजयाचा गोवर्धन माझी गोर गरीब जनता…

विशाल परब:जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात..

⚡सावंतवाडी ता.०४-: माझ्या विजयाचा गोवर्धन माझी गोर गरीब जनता श्रीकृष्णाच्या रूपाने उचलेल आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला उपेक्षित ठेवणारी आजवरची चालू असलेली प्रस्थापित राजकीय गणिते उद्ध्वस्त करेल, असा विश्वास आज अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, माझ्यावर अर्ज मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला, परंतु, जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी अर्ज कायम ठेवत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page