अर्चना घारे परब आणि विशाल परब निवडणूक लढवण्यावर ठाम; सावंतवाडी मतदार संघात चौरंगी लढत..
⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये करण्यात आलेले बंड वरिष्ठ अपयश आले असून, बंडखोरानी माघार घेतली नसल्याने, महायुतीतील भाजपचे युवा नेते विशाल परब आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे परब यांनी आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आपलं अर्ज मागे न घेतल्याने दोन्ही नेते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
परंतु या दोघांचाही बंडखोरीचा फटका नक्की कोणाला बसणार हे येणाऱ्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढला आहे. तसेच यांच्या सोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि सावंतवाडीचे माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर आणि दत्ताराम गावकर यांनी देखील माघार घेतली नसल्याने याही अपक्ष उमेदवारांचे आवाहन असणार आहे.
