सौ. सायली आकेरकर यांचे अपघाती निधन…

भाऊबीज करून परतत असताना झाला अपघात:सौ. आकेरकर कोकण रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचारी..

कुडाळ : कोकण रेल्वेच्या माजी कमर्शियल क्लार्क आणि कुडाळ कवीलकट्टा येथील रहिवासी सौ सायली शरद आकेरकर (60) यांचे रविवारी रात्री उशीरा कविलकट्टा येथून कुडाळ येथे असताना अपघात होऊन निधन झाले.
सौ आकेरकर या आपल्या कविलकट्टा येथील घरी गेल्या होत्या. घरी भाऊबीज कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा त्या मुलीसोबत दुचाकीवरून कुडाळ येथे राहत असलेल्या माठेवाडा येथील निवासस्थानी परत येत होत्या. मांजर आडवे आल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन सौ आकेरकर या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना कुडाळ ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले. उपचार सुरू असता त्यांचे निधन झाले . अपघात रात्री पावणे बाराच्या सुमारास झाला. कोकण रेल्वेमध्ये त्या कमर्शियल क्लार्क म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी व त्यांच्या त्यांचे पती शरद आकेरकर यांनी कुडाळ येथे व्यवसाय सुरू केला होता. रेल्वेचे कर्मचारी शरद आकेरकर यांच्या त्या पत्नी होय. सौ आकेरकर यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

You cannot copy content of this page