राजन तेली यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी…

अमित सामंत यांनी केले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.राजन तेली हेच असून सावंतवाडी.दोडामार्ग. वेंगुर्ला,तालुक्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारात एकदिलाने आणि जोमाने सहभाग घेऊन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विजयी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले.

दरम्यान याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा खासदार शरदचंद्र पवार यांच्या आताच प्राप्त झालेल्या आदेशानुसार जाहीर केले आहे, त्याप्रमाणे सावंतवाडी.दोडामार्ग. वेंगुर्ला तालुक्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page