⚡मालवण ता.०३-: मालवण मधील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन पक्षप्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
प्रवेश कर्त्यांमध्ये हर्षद परब, सागर वराडकर, भारती वाघ, भाग्यश्री लाकडे, मनुजा वारंग, रेणुका लाड, कुणाल धुरत, सिद्धेश घोगळे यांचा समावेश आहे. परशुराम उपरकर यांनी शिवबंधन बांधून सर्वाचे पक्षात स्वागत केले. यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, विनोद सांडव, अमित भोगले, नीनाक्षी मेथर आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
