मालवण तालुक्यात नेटवर्कचा बोजवारा…

वेळीच सुधारणा न झाल्यास कर्मचाऱ्यांना कोंडणार;भाजपा तालुकाध्यक्ष चिंदरकर यांचा इशारा

*💫मालवण दि.१६-:* मालवण तालुक्यातील नेटवर्कचा बोजवारा उडाला आहे. नेटवर्क कंपन्यांचे याकडे दुर्लक्ष होत असून तालुक्यातील नेटवर्क वेळीच न सुधारल्यास भाजपतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, प्रसंगी कंपन्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलं जाईल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. गेले दिवस मालवण तालुक्यात किंबहुना ग्रामीण भागात नेटवर्कचा बोजवारा उडाला असून त्याची झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. आचरा परिसरात तर सर्वच नेटवर्क ठप्प पडले असून ग्रामीण भागातही तीच स्थिती आहे. यामुळे सध्याच्या लॉकडाऊन काळात लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही नेटवर्क कंपन्यांच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला काहीही फरक पडत नसल्याचे लक्षात आले आहे. परंतु आता पाणी डोक्यावरून जात असल्याने सबंधित कार्यालयावर धडक देऊ, परिणामी कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलं जाईल आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांचीच राहील. कंपन्यांनी वेळीच सुधारावे अन्यथा होणाऱ्या परिणामास सामोरे जावे असा आक्रमक इशारा धोंडू चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

You cannot copy content of this page