मळगावात बीएसएनएल मोबाईल नेटवर्क कोलमडला…!

⚡सावंतवाडी ता.०३-: गेले तीन दिवस मळगाव येथे बीएसएनएल ग्राहकांना नेट व नेटवर्क नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहेत. बीएसएनएल नेट असलेल्या काही शाळांमध्ये ऑनलाईन कामे प्रलंबित राहिली आहेत. ग्रामीण भागात ऑनलाइन कामे करणाऱ्यांना याचा फटका बसला आहे.

ग्राहकांना बीएसएनएल मध्ये सीमकार्ड परीवर्तीत करून चांगली सुविधा देता येत नसेल तर बीएसएनएल सिमकार्ड चा काय फायदा? असा संतापजनक प्रश्न मळगावातील ग्रामस्थ, व्यापारी वर्गातून केला जात आहे.
वारंवार खंडीत होणाऱ्या बीएसएनएल मोबाईल नेटवर्क गांभीर्याने अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बीएसएनएल मोबाईल नेटवर्क सुरळीत करावा अशी मागणी मळगावातील नागरीकांनी केली.

You cannot copy content of this page