दीपावली पाडव्याचा मुहूर्त; यावर्षीही पहिली आंबापेटी पाठवण्याचा पटकावला मान..
⚡मालवण ता.०३-: मालवण कुंभारमाठ येथील प्रतिथंयश अंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर आणि त्यांचे बंधू सूर्यकांत फोंडेकर यांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधत दि. २ नोव्हेंबर रोजी या वर्षातील पहिली हापूस आंब्याची पेटी नाशिक येथे थेट ग्राहकांपर्यंत पाठविण्याचा मान पटकावीला आहे. यापूर्वी श्री फोंडेकर यांनी राज्यात तीन वेळा हापूस आंब्याची पेटी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याचा मान मिळविला होता
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील प्रथितयश आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर आणि त्यांचे बंधू सूर्यकांत फोंडेकर हे राज्यात सर्वप्रथम हापूस आंबा पेटी पाठविण्यात माहीर आहेत यावर्षी आजपर्यंत जिल्ह्यात पडणारा मुसळधार पाऊस, वादळी वारे यांच्या पासून संरक्षण करून तसेच बुरशी आणि किडीवर योग्य फवारणी करून आंबा बागायती मधील आंब्यावरील फळ पिकविण्यात फोंडेकर बंधू यांना यश आले आहे. हे सर्व करताना त्यांना तारे वरची कसरत करावी लागली. श्री. फोंडेकर यांनी राज्यात चौथ्यांदा सर्वप्रथम आंबा पेटी बाजारात पाठविण्याचा मान मिळविला आहे. एकूणच त्यांच्या कार्याबद्दल डॉक्टरेट प्रदान करण्यात आली असून याबद्दल त्यांना मालवण तालुका कृषी विभागाने मोलाचे मार्गदर्शन केले आहे. यावर्षीची पहिली आंबा पेटी पाठविण्याचा मान उत्तम फोंडेकर आणि सूर्यकांत फोंडेकर यांनी मिळविल्याने फोंडेकर बंधू यांचे कृषी अधिकारी एकनाथ गुरव आणि इतरांनी अभिनंदन केले आहे.
