शहरात अनाधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावण्यास प्रतिबंध…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्ती/संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विरुपीत करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानूसार नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात प्रदर्शीत करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दुर (नष्ट) करुन इमारती, मालमत्ता पूर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणुकीच्या कालावधीमध्ये शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत) निर्बंध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी आदेशित केले आहे.
00000

You cannot copy content of this page