सरमळे माजी सरपंच अर्जुन गावडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश…!

⚡सावंतवाडी ता.१७-: सरमळे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आणि गेली अनेक वर्ष सतत देवी भगवतीची व सपतनाथाची निस्सीम सेवा करणारे गावात प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणारे असे आदर्श व्यक्तिमत्त्व माजी सरपंच श्री.अर्जुन गुणाजी गावडे यांचा सौ.अर्चनाताई घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

प्रवेश करते वेळी गावडे म्हणाले अर्चना ही आमची मुलगी आहे आणि तिचे आजचे तळागाळातील कार्य पहाता त्यांची वाटचाल ही खूप लोकांना प्रेरणा देणारी व महिलांना आदर्शदायी अशी आहे. त्या मुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आपण कटिबद्ध राहून येत्या विधानसभेसाठी काम करेन.
यावेळी त्यांच्या समवेत श्री.रामदास सावंत , सावंतवाडी शहराध्यक्ष श्री.देवा टेमकर , नंदकिशोर साटेलकर , विनायक परब , सावंतवाडी विधान सभा युवक अध्यक्ष विवेक गवस व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page